धाराशिव (प्रतिनिधी)-हिंदी पंधरवाडा निमित्ताने आर.सी.एफ. क्षेत्रीय कार्यालय अहमदनगर अंतर्गत आर. सी.एफ. जिल्हा कार्यालय, धाराशिव यांच्या विद्यमाने जि.प.प्रा. शाळा, गावसुद ता. जि. धाराशिव येथील इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 'भारतीय शेतकऱ्याचे आत्मचरित्र' या विषयावर निबंध स्पर्धा दि. 18 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. 

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके शालेय दप्तर, टिफिन डब्बा आणि कंपास पेटी देवून गौरविण्यात आले आणि स्पर्धेतील प्रत्येक सहभागीं विद्यार्थ्याला पेन्सिल, शार्पनर आणि खोडरबरचा संच देऊन प्रोत्साहन देण्यात आले. 

आर. सी.एफ. लि. धाराशिव जिल्हा प्रभारी श्री गणेश खाडे यांनी विद्यार्थ्यांना 'हिंदी पंधरवाडा'चे महत्त्व समजावून सांगून हिंदीचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांना पीआयडीपीआय द्वारे करण्यात येणाऱ्या तक्रारींच्या संदर्भात माहिती देऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन गणेश खाडे (जिल्हा प्रभारी), रमाकांत सरडे (मुख्याध्यापक), मंजुषा भुतेकर (हिंदी शिक्षिका), रमाबाई सोनवणे (कार्यक्रम समन्वयक), आशिष जाधव (पॉस फॅसिलिटेटर), श्री गौतम तेरकर (कार्यालय सहाय्यक), उपस्थित होते.


 
Top