धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या 14 दिवसापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण या न्याय मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागणीस मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उस्मानाबाद जिल्ह्याने पाठिंबा दिला आहे अशी माहिती शेख मसूद यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश साळुंके, अक्षय नाईकवाडी गेल्या 5 दिवसापासून मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. मुस्लिम समाजाच्यावतीने जाहीर पाठिंब्याचे पत्रक मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आले. सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर पावले उचलले नाहीत. त्यामुळे दोन्ही समाजात शासनाविरूध्द असंतोष आहे. मुस्लिम समाज आपले हक्काचे 5 टक्के आरक्षण मागत आहे त्यावेळी मराठा समाजानेही पाठिंबा द्यावा अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. यावेळी खलिफा कुरेशी, कादर खॉन, अनवर शेख, अतिख शेख, काझी हासीब, बाबा मुजावर, बिलाल तांबोळी, वाजिद पठाण आदी उपस्थित होते.