तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सोमनाथ माळी,यांच्या नियुक्ती झाल्यानंतर प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली. ती स्थगिती उठल्यानंतर तातडीने रूजू होण्याचे मिळताच सोमनाथ माळी यांनी शुक्रवार दि. 22 रोजी सांयकाळी श्री तुळजाभवानी प्रशासन कार्यालयात येवुन पदभार स्विकारल्या नंतर मंदिरात जावुन देवीदर्शन घेतले. योगिता कोल्हे यांची बदली झाल्यानंतर चार ते पाच महिने मंदिर कारभार प्रभारी नायब तहसिलदार वर चालवला जात होता. अखेर शारदीय नवराञोत्सव पुर्वी पुर्णवेळ तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन मंदिरास मिळाल्याने मंदिराचा कारभारात आता सुसुञता येणार आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील 4 (4) व 4 (5) मधील व सा.प्र.वि. च्या महसूल
विभाग वाटप नियम, 2021 अधिसूचना दि. 14.7.2021 मधील नियम 8 मधील तरतूदींनुसार सक्ष प्राधिकारी यांच्या मान्यतेने सोमनाथ माळी, तहसिलदार यांना संदर्भ क्र. 1 येथील दि.27.07.2023 रोजीच्या शासन आदेशान्वये अपर तहसिलदार भिसी, ता. चिमूर जि. चंद्रपूर या पदावरुन तहसिलदार तथा
व्यवस्थापक श्री. तुळजाभवानी मंदिर, प्रशासन तुळजापूर या रिक्त पदावर बदलीने पदस्थापना देण्यात आली होती. सदर माळी यांच्या बदली आदेशास संदर्भ क्र. 2 येथील दि. 27.07.2023 रोजीच्या आदेशान्वय प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, बदली आदेशावरील स्थगिती उठेवल्याने आता माळी यांच्या बदली आदेशास देण्यात आलेली स्थगिती प्रशासकीय कारणास्तव या आदेशाद्वारे उठविण्यात येत आहे
विभागीय आयुक्त, नागपूर/ औरंगाबाद.
सोमनाथ माळी, तहसिलदार यांनी समक्रमांक दि.27.07.2023 रोजीच्या शासन आदेशानुसार तहसिलदार तथा व्यवस्थापक श्री. तुळजाभवानी मंदिर प्रशासन तुळजापूर या रिक्त पदावर तातडीने रुजू व्हावे. असे आदैशात म्हटले आहे. हा आदेश शासनाचे उप सचिव अजित देशमुख यांच्या स्वाक्षरी निशी काढण्यात आला आहे.