परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी करण शिवाजी चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व जनविकास कॉलेज बनसारोळा ता. केज जि. बीड येथे दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या अंतर महाविद्यालयाने स्पर्धेत सर्वप्रथम येऊन सुवर्णपदक पटकाविले.त्याबद्दल संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे व प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा परभणे यांचे मार्गदर्शन लाभले.

करण चव्हाण याची राजस्थान येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


 
Top