तेर (प्रतिनिधी)- चौंडी  येथे यशवंत सेनेचे धनगर आरक्षणासाठी चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून तेर येथे धनगर समाज बांधवांच्या वतीने 13 सप्टेंबरला तेर येथे अहिल्यादेवी होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळण्यात आला.

चौंडी येथे धनगर समाज बांधवांचे गेल्या आठ दिवसापासून उपोषण चालू आहे.  राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे समाजामध्ये तीव्र स्वरूपाच्या भावना उमटत आहेत. या सरकारने लवकरात लवकर दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच  रमाकांत लकडे यांनी दिला व धनगर समाजाच्या युवकाने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला म्हणून समाज बांधवाला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुरक्षारक्षकाने व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्याच्या निषेधार्थ प्रतिघात्मक पुतळा जाळून त्याचाही निषेध करण्यात आला .यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने पीएसआय सुहास गवळी यांना निवेदन देण्यात आले.


 
Top