वाशी (प्रतिनिधी)-1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जिरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाचे शांततेत आंदोलन चालू असताना पोलिस कर्मचाऱ्यांकडून आंदोलकावर व महिलावर अमानुष लाठी चार्ज व गोळीबार करण्यात आला. याच्या निषेधार्थ दि. 2 सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यासह संबंध धाराशिव जिल्ह्यात कडकडीत बंद सकल मराठा समाजबांधवातून करण्यात आला. वाशी शहरात सकल मराठा बांधवांनी मोर्चा काढून एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी सकल मराठा बांधवचाकडून जालना जिल्ह्यातील आंदोलकावर झालेल्या अमानुष लाठीचार्ज व गोळीबार प्रकरणातील अधिकारी, पोलिस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबर करावे या संबंधीचे निवेदन तहसीलदार नरसिंग जाधव यांना देण्यात आले. यावेळी वाशी तालुक्यातील सकल मराठा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top