धाराशिव (प्रतिनिधी)-गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले व तालमीतून गणपती गल्लीतील सार्वजनिकरित्या चौकात रस्त्यावर गणेश पूजनाची व उत्सवाची सुरुवात करणारे  श्री बाल हनुमान गणेश मंडळच्या 58 वर्षापासून श्री गणेश प्रतिष्ठापना व  विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझीमचा खेळ जिवंत ठेवला आहे. त्याचे सातत्य व भारदस्त खेळ क्षमता, शक्ती, जोश, जोम निर्माण करणारा, रणवाद्यांच्या जोरावर विविध कौशल्य, विविध प्रकाराने व्यापक असलेला खेळ आहे. मंडळाच्या या लेझीम खेळासाठी महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक विभागातर्फे अलाहाबाद, हैदराबाद, सिकंदराबाद, चेन्नई  इत्यादी ठिकाणी महाराष्ट्राची शान व मान लेझीम खेळामुळे धाराशिव जिल्ह्याची मान उंचावण्याच्या प्रयत्न मंडळाने आज तागायत खेळातूून जिवंत ठेवला आहे. या गणेश मंडळाचे वैशिष्टये म्हणजे, स्वतः देखावे तयार करणारे मुर्तीकार, लेझीम खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंची परंपरा असणारे हे गणेश मंडळ आहे.

तिरुमला तिरुपती येथे देवस्थानच्या वतीने होणाऱ्या  ब्रह्मोत्सवामध्ये सतत नऊ दिवस दैनंदिन विविध अवतारातील छबिना मिरवणुकीमध्ये सहभाग. लेझीमचा खेळ प्रात्यक्षिक या मिरवणुकीत देशभरातील येणाऱ्या भक्तांच्या समोर सादर करण्याचा मान मिळालेला आहे. मंडळामध्ये वयाच्या दोन वर्षापासून ते 75 वर्ष वयाच्या व्यक्ती लेझीम खेळतात. दीडशे मुलां- मुलींचा खेळ सादर करणारे एकमेव मंडळ आजही तागायात लेझीमचा खेळ सादर केला जातो. ढोल, ताशा, हलगी व बुलबुल या वाद्यांच्या आवाजावर एक ताल एक सूर जोश पूर्ण व कलापूर्ण आकर्षक खेळ करण्याचा प्रयत्न चालू आहे. विशेष म्हणजे बाल हनुमान गणेश मंडळ गणपती समोर आकर्षक देखावे मंडळाचे काशिनाथ दिवटे व त्यांचे सहकारी श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर तयार करतात. विशेष म्हणजे बाल हनुमान गणेश मंडळामध्ये व्हॉलीबॉलमधील अनेक उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू असून, 7 ते  8 जणांना शिव छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. वर्षभर मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जातात.

मंडळास संस्थांचे व शासनाचे अनेक पारितोषिक मिळाविणारे मंडळ आदर्श ठरत आहे. मंडळातील लहान थोर गणेश दूत, गणेश भक्त, काशिनाथ दिवटे प्रा. गजानन गवळी, प्रा.भालचंद्र हुच्चे, राजकुमार दिवटे, मन्मत पाळणे, कुणाल दिवटे, विद्यानंद  साखरे, वरून साळुंखे, आप्पाखरवरे, कांबळे, मनोज अंजीखाने, युवराज हुच्चे, ॲड. निलेश बारकडे, केदार उपाध्ये, दहीहंडी बंधू, विशाल देशमाने, बसवेश्वर  पाळणे, विश्वास दळवी, बुरुंग बंधू इत्यादी पदाधिकाऱ्यांसह, खेळाडू म्हणून उपस्थित होते.नवशिके, नव बालक युवक व युवती वयोवृद्ध इत्यादींना खेळण्यास शिकण्यास,सरावास  संधी मिळावी म्हणून एक महिना पूर्व खेळ सरावास सुरुवात केली. 


 
Top