परंडा (प्रतिनिधी) - येथील तहसील कार्यालयासमोरील व्यापारी संकुलात परंडा मीडिया सेंटरची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते मंगळवारी दि.11 रोजी करण्यात आले.
याप्रसंगी सावंत यांनी मीडिया सेंटरच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद खर्डेकर, सुरेश घाडगे, मुजीब काजी, प्रमोद वेदपाठक, भजनदास गुडे, प्रशांत मिश्रा, निसार मुजावर, तुकाराम गंगावणे, शहाजी कोकाटे, किरण डाके, संतोष शिंदे, प्रकाश काशीद, गणेश राशनकर, विजय माने आदी उपस्थित होते.