तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह तालुक्यात अनंतचतुर्थी दिनी गुरुवार दि 28 रोजी  श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात येवुन विघ्नहर्ता श्रीगणरायाला गणपती बाप्पा मोरया या पुढल्या वर्षी लवकर या च्या जयघोषात निरोप देण्यात आला .     

विघ्नहर्ता श्रीगणरायाला निरोपानंतर शहरवासियांना आता नवराञोत्सवाचे वेध लागले आहे.आता नवराञोत्सव पुर्वतयारी सुरु झाली आहे. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या गणपती मुर्ती राञी  छबिना वाहनावर  समोरच्या बाजुला ठेवुन गोंधळाच्या कडकडाटात  मंदिर प्रांगणात छबिनासह  श्रीगणेश मुर्तीची  मिरवणूक काढुन विधीवत विसर्जन करण्यात आले. विघ्नहर्ता श्रीगणेश विसर्जनसाठी  दगडी खान तडवळा, पाचुंदा साठवण तलावात शहरातील घरघुती गणपतीचे विसर्जन दुपारी झाले.तर शहरातील राजाकंपनी पावणारा गणपती व रणसम्राट संघ सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रीगणेश मुर्तीचे पुजन श्रीतुळजाभवानी मातेचे महंत यांच्या हस्ते करण्यात येवुन भव्य मिरवणूक शुभारंभ झाला. यात लेझीम, ढोलीबाजा डीजे लहान मुलाचे डान्स अदि प्रेक्षणिय खेळ होते. या मंडळाच्या  श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन  राञी झाले.

काक्रंबा  - काक्रंबा  येथील जगदंबा गणेश तरुण मंडळाच्या श्री ची आरती शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धूरगुडे या प्रमुख मान्यवरच्या उपस्थितीत करण्यात  आल्यानंतर घेण्यात आलेल्या  विविध  पारितोषिक वितरण करण्यात आले.

सांयकाळी जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी हजेरी लावून गणरायाचे आरती केली व मिरवणुक गावितुन काढुन गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चेतन बंडगर, उपाध्यक्ष नागेश वगैरे, आकाश म्हेत्रे, साईसागर, योगेश वगैरे, पवन वाघमारे, गणेश स्वामी, रोहित मेत्रे, रंगनाथ झाडे, अक्षय राऊत, हणमंत सरक, शिवाजी गवळी, सारंग कानडे, गोटू वाघमारे योगेश मेत्रे अदा उपस्थित होते.


नारी शक्तीच्या आरती करुन“ श्री “ला निरोप ! 

तुळजापूर खुर्द येथील समर्थ गणेश मंडळाने नारीशक्तीच्या हस्ते श्रीचीआरती करुनही विघ्नहर्ता गणरायाला निरोप दिला.   


कुंकु आरगज्याचा रस्त्यावर सडा !

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांनी मुक्तपणे भगवा आरगजा व कुंकांची उधळण केल्याने कुंकु आरगज्याचे थर रुपी सडा पडल्याचे दिसुन आले.


 
Top