धाराशिव (प्रतिनिधी) येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, 'श्रावण सोहळा' कार्यक्रम प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात वन मिनिट गेम शो ,फुगडी, गीत गायन, संगीत खुर्ची, फेर अशा पारंपारिक, मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. या खेळामुळे विद्यार्थिनींना आपल्या विविध गुण कौशल्यांचे सादरीकरण करता आले. या कार्यक्रमास प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सौ. विद्या देशमुख, प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. रेखा ढगे, सौ मालखरे उपस्थित होत्या. 'वन मिनिट गेम शो' मधील विजेत्या मुलींना बक्षीस म्हणून रोपटे दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका वनिता बाबर यांनी केले, तर आभार प्राध्यापिका डॉ. वैशाली बोबडे यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सौ. विद्या देशमुख यांनी केले.
सदर कार्यक्रमास श्रीमती स्वाती बैनवाड, श्रीमती सुप्रिया शेटे,डॉ. स्वाती जाधव ,डॉ. अलका इनामदार, श्रीमती स्मिता पवार, श्रीमती शितल शिंदे, डॉ. पूजा खरपडे, श्रीमती संध्या जगताप, श्रीमती स्वाती आकोसकर,श्रीमती भाग्यश्री गोंदकर, श्रीमती शिल्पा डोळे, डॉ. स्वाती शीलवंत, श्रीमती शलाका वाघ, श्रीमती संजीवनी जाधव,श्रीमती सुवर्णा गेंगजे,श्रीमती ज्योती राठोड, श्रीमती वृषाली गावित, श्रीमती शितल मोरे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.