वाशी (प्रतिनिधी) - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी  6 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ, नवीन जलवाहिनी आणि कचरा डेपोच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार (दि 15) रोजी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

शहराची पाण्याची गरज आणि उपलब्ध असलेले कमी क्षमतेचे जलकुंभ यामुळे शहराला सुरळीत पानीपुरवठा होण्यास समस्या निर्माण येत आहेत. त्यामुळे शहरातील बाजार समितीच्या समोर 6 लक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ आणि जलवाहिनी मंजूर करण्यात आले. यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या विविध  कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा सभापती विकास पवार, नगरसेवक राजु कवडे, बळवंत कवडे,  शिवाजी उंदरे, शिवशंकर चौधरी,  संतोष गायकवाड, सुमीत आहिरे, प्रशांत गायकवाड यांच्यासह  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रलंबित असलेल्या कचरा डेपोच्या जागेचा प्रश्नही मार्गी लागला असून कचरा डेपोचे कामही सुरू करण्यात आले आहे.  लवकरच कचऱ्यावर प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांनी यावेळी सांगितले.


 
Top