धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'गाथा मुक्ती संग्रामाची' या नाटकाचे आयोजन धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात करण्यात आले आहे.या नाटकाचा तिसरा प्रयोग धाराशिव शहरात बुधवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, येथे आयोजित केला आहे. तरी नाट्य प्रयोगास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा समन्वयक विशाल शिंगाडे यांनी केले आहे.
गाथा मुक्ती संग्रामाची हे नाटक सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने तयार करण्यात आले असून त्याचे सादरीकरण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद करणार आहे.या या नाटकाचे लेखन डॉ.सतीश साळुंके व शैलेश गोजमगुंडे यांनी तर डॉ.गणेश शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. या आधी जिल्ह्यात तुळजापूर व कळंब येथे प्रयोगाचे यशस्वी आयोजन केले आहे.
या तसेच या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या सह आदी अधिकारी, मान्यवर हे उपस्थित राहणार आहेत.नाटक पूर्णपणे निःशुल्क असून ते पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समनव्यक विशाल शिंगाडे यांनी केले आहे.