धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील अयान मोहल्ला, माळी गल्ली येथे दि 29 सप्टेंबर रोजी नूरानी ग्रुप तर्फे ईद मिलादुन्नबी निमित्त रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले. 50 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच 200 पेक्षा जास्त नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात येवून चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी नूरानी ग्रुपचे अध्यक्ष इर्शाद कुरेशी, सादेक कुरेशी, ईस्तीयाक कुरेशी, आरेफ नायकवाडी, इम्रान पठाण, बिलाल मोमीन, मोहोसीन मोमीन, राष्ट्रवादीचे अमित शिंदे व शहरातील विविध पक्षातील नेते मंडळींनी या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top