धाराशिव (प्रतिनिधी)-मंडळाच्या कार्याचा इतिहास गेली 59 वर्षापासून विविध केलेल्या कार्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून. धाराशिव नगरीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा सन्मान व श्री ची पूजाविधी भारत यात्रेतील एकनिष्ठ कार्यकर्ता शरफराज काजी कृष्णा तवले व समाजसेवक महाराष्ट्र राज्य वीज महामंडळातील सेवा निवृत्त कर्मचारी ॲड. सुदेश माळाले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मंजूळ व भारदस्त आवाजात  काशिनाथ दिवटे, संजय पाळणे ,विश्वास दळवी, श्रीची आरती  मंत्रउच्चाराने प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. यावेळी प्रथम सर्व विविध धर्मग्रंथ यांची पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची करणे.अन्याय ,अत्याचार, जुलूम याच्या विरोधात रयतेचे राज्य निर्माण करणे यासाठी शपथ घेण्यात आली. हा देखावा पाहून आनंद व्यक्त केला .भारत यात्रेमध्ये कृष्णा तवले व सरफराज काझी या दोघांचा कन्याकुमारी ते काश्मीर या चौदाशे किलोमीटरचा,150 दिवसात  पायी प्रवास करून ,भारत देशातील विविध संस्कृती ,भाषा, वेशभूषा, आहार इत्यादींचा जवळून अभ्यास या भारत यात्रेमध्ये अनुभवाला मिळाला. नकाशातून भारत पाहणे एवढेच काम आपले होते .परंतु भारत यात्रेची ही संधी आम्हाला मिळाली धर्म काय असतो हे या पदयात्रेतून जाणवला माणुसकीचा धर्म, वेदनेचा धर्म , बेरोजगारी ,शेतकऱ्यांच्या समस्यां.  विविध राज्यातील तापमान,  हवामान , पीक, पाणी ,स्थानिक समस्या  यातून जाणता आलं. भारत यात्रा म्हणजे फक्त पदयात्रा नव्हती तर तारुण्यात उमीॅ ,गुरमी, ही क्षमता, ताकद, स्वाभिमान, अभिमान  अजमावणे. जनजागृती करता येते. प्रत्येक कार्य मन लावून, हृदयापासून केले. तर दीडशे दिवसाचा प्रवास किती सुखकारक होता हे जाणवले. असे सत्कारास काझी व तवले यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

 सुदेश माळाले यांनी हे मंडळ 59 वर्षापासून काम करताना व त्यांची कार्यपद्धती व तळागाळातील व्यक्तीने केलेल्या कार्याची नोंद कशी घेतात व आमच्यासारख्या दुर्लक्षित असलेल्या घटकाकडे त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करूनच सन्मान हे आश्चर्यकारक आहे. मंडळाचे कार्य स्तुत्यपूर्ण असून आमच्या जिल्ह्याची शान आहे असे उद्गार काढले. 

या सर्वांचा सन्मान व सत्कार मंडळाच्या वतीने मंडळाची शिल्ड, श्री ची प्रतिमा व मंडळाचा शेला देऊन प्रा. गजानन गवळी, एडवोकेट अमोल दिवटे, काशिनाथ दिवटे, विद्या साखरे,  संजय पाळणे , विश्वास दळवी, नंदकुमार हुच्चे इ.सत्कार केला. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व सर्व गणेश भक्त  गणेश दूत , गणेश सेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भालचंद्र हुच्चे यांनी केले व राजकुमार दिवटे यांनी आभार मानले फटाक्याच्या आतषबाजीत समारोप करण्यात आला.


 
Top