धाराशिव (प्रतिनिधी)- भौतिक सुख साधने निर्माण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू लागलो. परंतु विचारांनी आचारानी माणसातलं माणूसपण जागं झालं पाहिजे हेच कार्य गवळी गल्लीतील गणेश मंडळ करीत आहे. गवळी गल्ली गणेश मंडळ हे विविध कार्याने महाराष्ट्रात आदर्श कार्य करणारे आहे असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.


गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपतीची पुजा दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हस्ते करण्यात आली.

 आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग मुला मुलींना व दिव्यांग मुला मुलींच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.  सर्व लहान मुला मुलींना मंडळाच्या वतीने खाऊ व टॉवेल्स देऊन सर्वांचा सन्मान करण्यात आला. नादुर्ग, चौगुले, लोमटे, रामचंद्र दळवी, तुषार कांबळे, जैन, अक्षय हंचाटे, बामनकर आदींचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला. मंडळाचे कार्यवाह मनमत  पाळणे, प्रा. भालचंद्र हुच्चे, प्रा. गजानन गवळी डॉ. अजित नायगावकर, सपॅमित्र मुझमिल पठाण, मयूर काकडे, राजाभाऊ साळुंखे, दिव्यांग क्षेत्रातील कार्य करणाऱ्या प्रमुखांचा ही सन्मान आमदार कडू यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मूर्तिकार काशिनाथ दिवटे, संजय पाळणे, बसवेश्वर पाळणे, ॲड. अमोल दिवटे, युवराज हुच्चे, केदार उपाध्ये, विश्वास दळवी, सागर पाळणे, वैभव मनोज, अंजीखाणे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 


 
Top