धाराशिव (प्रतिनिधी) - पत्रकार प्रकाश स्वामी यांची कन्या ऋतुजा स्वामी हिचा धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी नंबर लागला आहे. याबद्दल आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सोळाव्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये तिचा सत्कार करण्यात आला.
8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये आरोही आकाश मस्तुद, जान्हवी संतोष शिंदे, भार्गवी संतोष कदम, तारा विशाल गुरव या मुलींच्या नावे पाच हजार रूपये एफडी व शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच कॉलरशिपच्या आठवी व पाचवीमध्ये प्रथम आलेल्या संस्थेच्या सभासदस्यांच्या मुलांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये अनघा प्रशांत जोशी, प्राजक्ता रामलिंग पडवळ, अनुजा संतोष पाटील यांचा समावेश आहे. यावर्षी मेडिकल एमबीबीएससाठी निवड झालेल्या सभासदांच्या मुलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये ऋतुजा प्रकाश स्वामी, इश्वरी अमरसिंह देशमुख, शंभुराजे अमरसिंह देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन जयश्री भुसारे, व्हा.चेअरमन सविता कोरडे, सचिव संजीवनी कपाळे, कुंजवणी स्वामी आदींसह संस्थेचे सर्व सभासद, महिला, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.