धाराशिव (प्रतिनिधी) - गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने मानाचा गणपती व धाराशिव चा महाराजा यानी गेली 59 वर्षापासून समाज ,राष्ट्र सेवेच्या व भक्तीतून अनेक कार्यक्रम अखंडपणे चालू ठेवलेले आहेत. गणेशोत्सव म्हणजे गणपतीच्या अंगातील असणाऱ्या 64 कलांना जीवनामध्ये स्थान देऊन या बालकांचा विकास विविध अंगाने विचार व आचाराने व्यक्तिमत्व घडवणे  हेच कार्य उत्सवातील असले पाहिजे असा विचार गुणवंत कामगार पुरस्कर्ते मनमत पाळणे यांनी व्यक्त केले .उत्सव ,सण म्हणजे चार भिंतीच्या आतील नव्हे तर मैदान व मैदानावरील विविध खेळ ,कला, क्रीडा जोपासणारे ठरले पाहिजे. तर तो खरा आनंद उत्सव.

श्री बाल हनुमान गणेश मंडळ गवळी गल्लीने केली 59 वर्षापासून व्यक्तिमत्व विकास  घडावा  बालकांचा विकास व्हावा कायकरीत आहे . स्वआधार गतिमंद व अनाथ मुलींना महोत्सवात या दिव्यांगाना स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन रांगोळी ,लांब उडी ,गोळा फेक ,मूर्ती बनवणे,प्रशिक्षण देणे, टाकावू टिकाऊ विविध निसर्गातील असणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून घेतला पाहिजे. चित्रकला, खेळ, क्रीडा ,योगा इत्यादींच्या स्पर्धा घेणे हेच आजच्या या डिजिटल युगामध्ये गरजेचे आहे .असे प्रा. गजानन गवळी राष्ट्रीय खेळाडू यांनी मांडले गणेशोत्सवाच्या या कालावधीमध्ये या स्पर्धांचा आयोजन करून या दिव्यांग व अनाथ मुलींना सर्वसामान्य माणसांच्या त्याच समाधानाचे स्थान दिले जात आहे . मुलींनी स्वागत गीत म्हणून मंडळाच्या सभासद पदाधिकारी यांचा फुल देऊन सन्मान केला. 

यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक व प्रकल्प संचालक जी .ए .थोडसरे  कुदळे इ.शिक्षका सेविका, मदतनीस हजर होते. या सर्व स्पर्धेच्य उद्घागाटनास राहुल गवळी, वैभव अंजीखाने आणि मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. शाळेतील सर्व कर्मचारी व स्वाधार येथील सर्व 116 मुली हजर राहून रांगोळी स्पर्धेच्या वेळी या लहान मुलींच्या कलात्मक व आनंदीमय जीवनामध्ये वातावरण निर्माण करण्यामध्ये गणेश मंडळांनी उचललेले हे पाऊल प्रगतिशील ठरणार आहे. 

यावेळी प्रा. भालचंद्र हुच्चे यांनी प्रास्ताविकात गणेश मंडळाच्या विविध कार्यक्रम उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी पोषक आहार व पौष्टिक अन्नधान्य, भरड धान्य या जनजागृतीच्या माध्यमातून येथील सर्व मुलींना या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा निमित्ताने विविध घोषवाक्य म्हणून, मटकी खा मोडाची-वाढ होईल हाडांची, जो खाईल पोषक आहार-दूर पळतील सारे आजार. भरड धान्य चवदार-हाच खरा निरोगी आहार, अशा विविध घोषणा देऊन ज्वारी बाजरी नाचणी तिचे महत्व .पॉपलेेट जाहिरातीचे प्रकाशन करण्यात आले. बालीका जन्मोत्सव, स्त्री भ्रूण हत्या रोखा, मराठवाडा मुक्ती संग्राम संग्राम दिन अमृत महोत्सव निमित्त मंडळाच्या वतीने मशाल फेरी, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुला मुलींना खाऊ वाटप व भरड धान्याचे महत्त्व  =पोषण आहार याविषयी अभियान,जन जागृती ,रक्तदान ,अवयव दान जागृती, मंडळांनी या गणेशोत्सवांमध्ये आयोजन केलेले आहे. या महोत्सवाचे उद्घागाटन प्रसंगी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे आभार व संचलन थोडसरे व कुदळे मॅडम यांनी केले. रांगोळी स्पर्धेच्या स्पर्धकांची कला पाहून समारोप झाला.


 
Top