धाराशिव (प्रतिनिधी)- आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट 2023 चे वेतन 17 सप्टेंबर 2023 पर्यंत मिळावे , वेतन नाही मिळाले तर आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी मराठवाडा मुक्ती संग्रामा दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करतील, असा इशाराच  जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे शिक्षक प्रतिनिधी सतिश कुंभार यांनी दिला आहे.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  आयुक्त  बाबासाहेब आरावत त्यांनी 28 आश्रम शाळेचे बिल पास केले आहे, परंतु जाणीवपूर्वक 8 आश्रम शाळा माहे ऑगस्ट 2023 च्या वेतनास वंचित ठेवल्या आहेत. दिनांक 17 सप्टेंबर 2023 त्यांचा तात्काळ पगार करून न्याय व हक्काची मागणी पूर्ण करावी. अन्यथा उर्वरित आठ आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी जिल्हाधिकारी  कार्यालय, धाराशिव समोर आत्मदहन करतील,असा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आल्या आहे.  


 
Top