धाराशिव (प्रतिनिधी)-अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रतिष्ठान भवन, भाजपा कार्यालय, धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांना मिठाई देऊन त्यांनी मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड.अनिल काळे, मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, डॉ.मनोज घोगरे, पांडुरंग लाटे सर, सतीश देशमुख, शिवाजी पंगुडवाले, संदीप इंगळे, ओम नाईकवाडी, सिधोजी राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, राजेंद्र अडसूळ, हिम्मत भोसले, किरण पवार, जितेंद्र नाईकवाडी, नरेन वाघमारे, सागर दंडनाईक, सुनील पंगुडवाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top