वाशी (प्रतिनिधी)-कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्सहात साजरा करण्यात आला. हे वर्षे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी व महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी असल्यामुळे या सप्ताहात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयात  स्वछता  वक्तृत्व स्पर्धा , रक्तदान ई. कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आले व दि 17/9/2023 रोजी सकाळी 7.40 वाजता प्राचार्य डा. रविंद्र कठारे यांचे हस्ते झेंडा वंदन झाले व त्यानंतर 8.00 वाजता  स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी श्रीमती. वत्सला बाबुराव कागदे ( गोलेगाव ता. वाशी, श्रीमती सुदामती साहेबराव कागदे  (गोलेगाव ता. वाशी ), श्रीमती यमुनाबाई साहेबराव  मांगले (घाटपिंपरी ता. वाशी ), व श्रीमती सुलोचना महादेव देवडीकर  ( वाशी ता. वाशी ) यांचा  सत्कार प्राचार्य डॉ रविंद्र कठारे व प्रा अशोक पाटील यांच्या हस्ते  करण्यात आला.  याप्रसंगी प्रा अशोक पाटील मराठी विभाग यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात मामांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनांनी झाली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने प्रतिज्ञा वाचन प्रा शाम डोके यांनी केले व प्रमुख वक्ते अशोक पाटील  यांनी मराठवाडा लढ्या बदल सविस्तर माहिती सांगितली तसेच श्री कागदे यांनी अनुभव विषद केले . प्राचार्य डॉ कठारे सर यांनी अध्यक्ष समारोप केला प्रस्ताविक प्रा विश्वास चौधरी यांनी केले तर आभार प्रा सुनिता डोके यांनी मानले सुत्रसंचालन प्रा .सुनील आवारे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता  राष्ट्रगीतांनी  झाली.


 
Top