धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात 13 सप्टेंबरपासून आयुष्यमान मोहिम राबविली जात असून, पाच निकषानुसार आयुष्यमान ग्रामपंचायत घोषित केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षयरोग, कुष्ठरोग, कोरोना या तिन्ही रोगातून मुक्त करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

15 सप्टेंबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकरी गुप्ता यांनी  सांगितले की, जिल्ह्यात 6 लाख लोक आरोग्य कार्ड पात्रता धारक आहेत. त्यापैकी 35 टक्के लोकांना आयुष्य कार्ड वाटप केल्याचे सांगून उर्वरित लोकांचे आरोग्य कार्ड लवकरच वितरीत करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात सेवा सप्ताहनिमित्त 11 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. रक्तदान शिबीर, अवयवदान प्रतिज्ञापत्र, आयुष्यमान सभा, 0 ते 18 वयोवर्ष मुलांची तपासणी आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आयुष्यमान ग्रामपंचायत जाहीर करण्यासाठी पाच निकष ठेवण्यात आले असून, क्षयरोग, कुष्ठरोग व कोरोनामुक्त यावर भर देण्यात आलेला आहे.


 
Top