धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये गणेश उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक गणेशमुर्ती तयार करणे स्पर्धा धाराशिव जिल्हा संस्कार भारती समिती च्या माध्यमात स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इ. 6 वी च्या 600 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला या स्पर्धेत परिक्षक कलाध्यापक तथा संस्कार भारती देवगिरी प्रांत चित्रकला विधा प्रमुख शेषनाथ वाघ यांच्या परिक्षणाअंती प्रथम क्रमांक वरदलक्ष्मी शितोळे, द्वितीय मनीष कुसळकर, तृतीय हर्ष झाडके यांनी पटकवला यांना प्रशालेचे मुख्याध्यापक साहेब देशमुख, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी , पर्यवेक्षक के.वाय गायकवाड , गुरुवर्य के.टी. पाटील अकादमी प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर, संदीप जगताप यांचे हस्ते बक्षीस देण्यात आले व विद्यार्थ्यानी तयार केलेल्या मुर्तीचे पुजन करण्याचे आवाहन केले. सदर स्पर्धा सहशिक्षिका सौ. संगिता शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिक्षीका सौ. मयुरी ठाकूर, सौ. व्ही. एल. पवार, सौ .मोरे आदि शिक्षीका वृंद सहशिक्षक रमेश चौधरी, हनमंत ठेले, अतुल शेरकर, हरि मंडोळे, आदि शिक्षकवृंदानी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.


 
Top