तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि.जालना येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर   पोलिसांनी निर्दयीपणे केलेल्या लाठी हल्यात अनेक महिला व पुरुष आंदोलक मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.

या घटनेचा निषेध म्हणून तिर्थक्षेञ तुळजापूर येथे  स्वराज्य संघटना, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज बांधवांनी छञपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येवुन शासनाचा जाहीर निषेध केला. नंतर शहरातुन निषेध रँली काढण्यात येवुन या घटनेची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निषेध रँली आरंभ होताच शहरातील व्यापारी वर्गाने आपले दुकाने बंद ठेवुन याला पाठींबा दिला.

शहर काही काळ बंद ठेवुन निषेध !                      

श्रावण मासा निमित्ताने श्री तुळजाभवानी  दर्शनार्थ आलेल्या भाविकांची गैरसोय होवु नये म्हणून शहरातील दुकाने काही काळ बंद ठेवुन शासनाचा निषेध करण्यात आला. 

मारहाण प्रकरणी संबंधितांवर  कारवाई करा ! 

शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील बांधवांवर शिंदे- फडणवीस-पवार सरकारच्या आदेशाने झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचारी, अधिकारी व शासनातील मंत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राज्यपाल महोदयांना जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. आज बसेस बंद असल्याने देवीदर्शनार्थ आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


 
Top