धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनसंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय सरचिटणीस पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या आज जयंती असुन यांच्या जयंती निमीत्त देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व विविध सामाजीक उपक्रम राबवुन जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्ष अर्चनाताई पाटील व माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी नितीन काळे यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या विषयी माहिती देतांना सांगीतले की जनसंघासाठी त्यांनी खुप मोलाचे योगदान दिले असुन समाजाचा अंतीम घटक असलेल्या व्यक्तीचा विकास ही अंत्योदयाची संकल्पना स्पष्ट केली. अशा महान विचार सरनी असणाऱ्या महापुरुषास जयंती निमीत्त विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अमर बाकले, सागर दंडनाईक, तसेच धाराशिव शहर व ग्रामीण भागातील भाजपाचे पदाधिकारी, महीला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top