धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील लेडीज क्लब च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे जिल्हास्तरावर भव्य प्रमाणात आयोजन केले होते. नुकतेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांनी संपूर्ण जिल्हाभरासाठी गौरी गणपती देखावा सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. याला जिल्हाभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

लेडीज क्लब मध्ये खास महिलांसाठी दि.24 रोजी गणपती अथर्वशीर्ष पठण ठेवले होते. यालाही महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. याच कार्यक्रमांमध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांना रोख पारितोषिक आणि सन्मानाचिन्ह  देऊन सन्मानित करण्यात आले. अत्यंत कल्पकतेने अनेक महिलांनी आपल्या गौरी गणपतीची सजावट केली होती. यामधून अनेकींनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. जिल्हाभरातून एकूण 70 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. उत्कृष्ट देखावा सादर केलेल्या मध्ये तुळजापूरच्या कविता गणेश कदम यांनी महाकालेश्वराचा अप्रतिम देखावा सादर केला होता, तर तुळजापूरच्याच पौर्णिमा अरविंद भोसले यांनी देवीचे नऊ रूपे अत्यंत सुंदर रित्या सादर केली होती. या दोन स्पर्धकांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिकाच्या विजेत्या ठरल्या आशा सुनील पाटील, निशिगंधा उमेश पाटील, अर्चना संभाजी चोपदार, आणि पल्लवी सचिन रोचकरी,  तृतीय पारितोषिकासाठी श्रुतिका हजगुडे ,सविता सुतार, सुवर्णा तांबारे, सोनाली पडवळ, निकिता कासार आणि शिल्पा पांचाळ यांच्या देखाव्याला मिळाले. तर विशेष प्राविण्य असलेल्या ज्योती कावरे ,नयना पाळणे, अर्चना निंबाळकर, शीला अडसूळ यांच्याही देखाव्याला सन्मानित करण्यात आले.

खास लेडीज क्लब ने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरणापूर्वी शहरातील महिलांसाठी अथर्वशीर्ष पठण ठेवण्यात आले होते .याला महिलांनी धाराशिव व परिसरातील सहभाग घेतला. यावेळी बोलताना लेडीज क्लबच्या अध्यक्ष अर्चनाताई म्हणाल्या की, महिलांमध्ये अनेक कौशल्य असतात. या गौरी गणपतीमुळे त्यांना देखावा सादरीकरणाची उत्तम संधी असून कोणी आपल्या कामाची दखल घेतली की प्रेरणा मिळते .म्हणून मी दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करत आहे. याला मैत्रिणींनी उत्तम असा प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण करणे परीक्षाकासाठी अत्यंत कठीण काम होते. कारण प्रत्येकीनीच देखावा अप्रतिम असा सादर केला होता. यामध्ये अनेकींनी  सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. इतर मैत्रिणींनी ही या त्यांच्या देखाव्यातून प्रेरणा घ्यावी. असेही त्यांनी आवाहन केले. क्लब आयोजित या कार्यक्रमांसाठी शहर व जिल्ह्यातून अनेक महिलांनी उपस्थिती लावली होती.


 
Top