धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचा सन 2023-24 चा द्वितीय गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उत्साहात पार पडला. श्रीमती मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

गतवर्षी प्रथम गळीत हंगामात कारखान्याने 71 हजार मेट्रिक टन ऊस गाळप करुन परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. यावर्षीच्या द्वितीय गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून रविवारी विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला.

श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या मातोश्री मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रतीक देवळे यांनी तर आभार गणेश कामटे यांनी मानले. सोहळ्यास व्यंकटेश कोरे, दिनेश कुलकर्णी, सुजित साळुंखे, हरी सिरसाठ यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top