धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हयातून जाणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी तुळजापूर-औसा राष्ट्रीय महामार्ग क्र.361 हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हयासाठीच नव्हे तर मराठवाडा व विदर्भ यांच्याशी थेट संपर्क निर्माण करणारा महामार्ग आहे. या मार्गासाठी 61.8 कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
या महामार्गावरील तुळजापूर-औसा तालुक्यात अनेक ठिकाणी अपुर्ण कामे 2019 या वर्षापासून प्रलंबित आहेत. सदर महामार्गावर या अपूर्ण कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढूण मोठया प्रमाणात जीवित व वित्त हाणी होत असल्या कारणाने नागरिकांकडून वारंवार तक्रारी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे प्राप्त होत होत्या. त्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या निर्दशनास आणून दिले तरीही प्रशासकिय विलंबा मुळे सदर कामास योग्य ती गती प्राप्त होत नव्हती. प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांनी सदर तुळजापूर तालुक्यातील सर्व अपूर्ण कामाचे अंदाजपत्रक विभागीय कार्यालया मार्फत अंतिम मंजूरी करिता ना. नितीन गडकरी साहेब यांच्याकडे पाठवूनदिले या कामाच्या अनुषंगाने मा. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.04/08/2022 रोजी दिल्ली येथे भेट घेऊन सदर महामार्गावरील उपरोक्त तालुक्यतील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत आग्रह व विनंती केली. त्यामुळे तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामार्गामुळे मराठवाडा व विदर्भातील तुळजाभवानी भक्तांना चांगली सुविधा मिळणार आहे.