धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिक्षकांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्कारांची पेरणी करावी असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी यावेळी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य सौ.डॉ. विद्या देशमुख ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, कार्यालयीन प्रबंधक दिलीप लोकरे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार डॉ.केशव क्षीरसागर यांनी मांनले.


 
Top