तुळजापूर (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू असताना सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तसेच पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ मराठा समाजातील महिलांच्या वतीने रविवारी (दि.10) श्रीक्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सरकारला मराठा आरक्षण देण्याची सदबुद्धी मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देऊन महिलांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. या आंदोलनानंतर स्थानिक पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सौ.मनीषा शिवाजी पाटील, सौ.क्रांती विशाल सूर्यवंशी, सौ.संध्या राजेश हवालदार, सौ.सरोजा रमाकांत शिंदे, सौ.सरोजा शहाजी दळवे, सौ.मनीषा शंकरराव मोरे, सौ.रेखा प्रशांत मुंडे, सौ.शशिकला गजेंद्र गुंजकर, मधुकरा नारायण मुंडे, सौ.संध्या संजय पवार, सौ.शारदा श्रीकृष्ण कावळे यांच्यासह महिला, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


 
Top