धाराशिव (प्रतिनिधी)- रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा अतिशय मानाचा नेशन बिल्डर अवॉर्ड सांजा इंटरनॅशनल स्कूल येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक श्यामसुंदर महादेव तनमोर यांना प्रदान करण्यात आला. बुधवारी (दि.06) रोटरी क्लब येथील सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनार साळुंखे तर प्रमुख पाहुणे डॉ. मीना जिंतूरकर या होत्या. श्री.तनमोर यांना सांजा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणांकनावर आधारित 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून गौरवण्यात आले. 2001 मध्ये शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. तनमोर यांनी शाळेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, उपचारात्मक वर्ग, शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर , इंग्रजी वर्तमानपत्र वाचन सराव, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत असे उपक्रम राबताता. त्यामुळे त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.