धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील गुजोटी येथे दि.16 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

गुजोटी येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या दिनानिमीत्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 510 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 100 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्य सौनिक पत्नी चंद्रभागाबाई सायबा कवटेकर, उदघाटक सरपंच  सरस्वती कोरे, प्रमुख पावणे संचालक छत्रपती शिवाजी शिक्षक संस्था उमरगा, उपसरपंच आयुब मुजावर, प्रमुख उपस्थीती मा. सरपंच शंकरराव पाटील, भाजपा महिला तालुका अध्यक्ष राणी राठोड, भाजप युवा मोर्चा ता. अध्यक्ष पिटु भैय्या साखरे, शाखा अध्यक्ष बाबुराव कलशेट्टी, अनुसुचीत जाती जमाती मोर्चाचे तालुका अध्यक्ष नागनाथ गायकवाड, सदिप जमादार, किरण पाचांळ, श्रीकृष्ण कवटेकर, गोदावरी साखरे, जयश्री कलशेट्टी, अमर नाईकवाडी व ग्रा.प सर्व सदस्य, गुजोटी ग्रामस्थ उपस्थीत होते. प्रास्तावीक विजय कुमार स्वामी यांनी यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.तेजस करमरकर, डॉ. अदित्य शर्मा, डॉ.कपिल कुमार काथवते, डॉ. इशा काटे, डॉ. रेवती बनसोडे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अमीन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, प्रा. आरोग्य केंद्र गुजोटी चे सर्व कर्मचारी व आशा कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.


 
Top