धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. तसेच श्री यशवंतराव जाधव मु. चिलवडी ता. जि उस्मानाबाद यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडुन दिला जाणारा जीवन साधना पुरस्कार चालू शै. वर्ष 2023 चा प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.

  तरी धाराशिव शहर आणि परिसरातील सर्व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.


 
Top