वाशी (प्रतिनिधी)- वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे आयुष्यमान भव या महाराष्ट्र शासनाच्या अभियानाची सुरुवात वाशी येथे शिबिराचे आयोजन करून करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. या शिबिरात 64 प्रकारच्या रोगाचे तपासणी मोफत केली जाणार आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी असे ऑनलाइन आवाहन  डॉक्टर  तानाजीराव सावंत यांनी नागरिकांना केले. 

यावेळी स्वास्थ्यरथ (मोबाईल मेडिकल युनिट ) चेही उद्घाटन धनंजय सावंत व वाशी तालुका शिवसेना नेते प्रशांत चेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिदास, डॉ. राधाकिसन पवार उपसंचालक परिमंडळ पुणे, डॉ. अर्चना भोसले उपसंचालक लातूर, डॉ. दयानंद कवडे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वाशी, डॉ. महेंद्रकर तालुका आरोग्य अधिकारी वाशी आरोग्य विभागातील कर्मचारी, परिचारिका, आशा वर्कर तसेच वाशी तालुका शिवसेनाप्रमुख ॲड सत्यवान गपाट, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत, अनिल खोचरे, सुरज साळुंखे बाळासाहेब पाटील हाडोंगरीकर, विकास तळेकर, शिवार स्वामी, सतीश शेरकर, नागनाथ नाईकवाडी, नितीन चेडे, उद्धव साळवी, बाळासाहेब मांगले यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


 
Top