धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील दारफळ येथे सुसज्ज अशा स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे उद्घाटन सरपंच तथा युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील बरेच युवक आर्थिक परिस्थीती हलाखीची असल्यामुळे शहराच्या ठिकाणी जा ये करुन तसेच शहराच्या ठिकाणी राहता येत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाहीत. ही बाब लक्षात घेउन गावचे सरपंच ॲड. संजय भोरे यांच्या संकल्पनेतून गावातच हे वाचनालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या पुस्तकांसह सरळसेवा, तलाठी, पोलीस भरतीचे दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बिभीषण पाटिल, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शशिकांत इंगळे,गुणवंत सुतार, प्रकाश घुटे,ज्ञानेश्वर इंगळे, तेजस भोरे, अभिजीत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रदीप बोरके, शिवाजी मोरे, विजय पाटिल, शिवाजी मरपळे, श्रीमती शशिकला कापसे, श्रीमती भाग्यश्री हुगे, श्रीमती रंजना करडे, शाहू मसे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.