धाराशिव (प्रतिनिधी)-विद्यानगर बावी येथील जवाहर माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तुळजाभवानी क्रीडा कार्यालय धाराशिव येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.
राठोड अभिजित याने 19 वर्षे वयोगटात 200 मीटर धावणे प्रथम व गोळा फेक द्वितिय क्रमांक पटकावला, राठोड करण गोळा फेक प्रथम क्रमांक मिळविला, पवार दिपक थाळी फेक या प्रकारात द्वितिय क्रमांक प्राप्त केला. तर 14 वर्षे वयोगटात राठोड मंथन याने उंच उडी मध्ये द्वितीय आला.तर 17 वर्षे रिले प्रकारात तिसरा क्रमांक मिळवून वरील विद्यार्थ्यांची जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बी. यू. जगताप, संस्थेचे सचिव दयानंद राठोड व अध्यक्ष विद्यानंद राठोड यांनी क्रीडा मार्गदर्शक व सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.