धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब येथील खंडोबा मंदिर भवानी चौक येथे दि.05 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
खंडोबा मंदिर भवानी चौक कळंब ता. कळंब जि.धाराशिव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 973 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 159 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे जेष्ट विश्वस्त अशोक भाऊ शिंदे, विजेद्र अण्णा चव्हाण, ग्रा.प सदस्य, भाजपा महिला शहर अध्यक्ष संगीता ताई कोकने, राहुल चौदे, पुर्वज चौदे, शितल सोडे, बंटी सोडे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सिध्दांत पेठकर, डॉ. लक्ष्मण इंगळे, डॉ.वेदांत रणाळकर, डॉ. शायेब शेख, डॉ. सोरभ इंगळे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे नामदेव शेळके, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, आशा कार्यकर्त्या पल्लवी गाडवे, अंजना सलगरे यांनी परिश्रम घेतले.