धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी येथे दि.24 सप्टेंबर 2023 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

पांगरधरवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या दिनानिमीत्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 710 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 150 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे तामलवाडी पोलीस स्टेशन चे निरिक्षक सुशिल चव्हाण, सरपंच सिंधू पाफळे, उपसरपंच सोमनाथ शिंदे, पत्रकार गणेश गायकवाड, महेश सावंत, प्रताप निंबाळकर, बालाजी डोंगरे, बालाजी शिंदे, शंकर कदम, अमोल मारडकर, ग्रा.प. सदस्ये बापू साळूंके, योगेश निंबाळकर, लक्ष्मण क्षिरसागर, नागनाथ मारडकर, महादेव सावंत, शाबीर शेख, शिवाजी साळुंके, शिवाजी गाटे इत्यादी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.नयन लोढा, डॉ. अभिषेक पगारे, डॉ.तेजस कदम, डॉ. नम्रता जयस्वाल, डॉ. जोत्सना दमाने यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे व आशा कार्यकर्त्या विद्या निंबाळकर, अनुराधा कदम यांनी परिश्रम घेतले.


 
Top