तुळजापूर (प्रतिनिधी)- भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरीही येथील तालुका कृषी कार्यालयात तब्बल 30 जागा रिक्त असल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांना कृषी योजना नवनवीन तंत्रज्ञान ची माहीती मिळणे कठीण बनले आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. ही मुख्य जबाबदारी कृषी विभागाचे आहे. मात्र, येथील कृषी विभागात मागील काही वर्षापासून कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वणवा असल्याने शेतकरी वर्ग कृषी योजनां पासुन वंचित राहत आहे.
तुळजापूर कृषी कार्यालयात मंजूर पदे 84 असुन भरलाले पदे 54 आहेत. तर 30 पदे रिक्त आहेत. त्यात मंडळ कृषी अधिकारी 3, कृषी सहाय्यक 18. अनुरेखक 6, वाहन चालक शिपाई 2 असे एकुण 30 पदे रिक्त आहेत. म्हणजे जवळपास चाळीस टक्के साठ कर्मचाऱ्यांवर 128 महसुलचा कारभार कृषी कार्यालय हाकत असल्याने त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण तर पडतोच, शिवाय शेतकरीही अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, आधुनिक कृषी पद्धतीची माहिती व्हावी, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे, याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका कृषी कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावत असते पण येथे तीस जागा रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरते मुळे शेतकऱ्यांचे कामे वेळेवर होत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ओरड वाढली. शेतकरी सन्मान योजनेसाठीच्या ई-केवायसी,
आधार फीडिंग, ई-पीक पहाणी, मतदान नोंदणी, पिकांचे पंचनामे अशा कामांचा भार तालुका कृषी कार्यालयाची जबाबदारीमहत्त्वपूर्ण आहे. हे कार्यालय राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत येते. माञ हे काम करताना प्रचंड ताण या कार्यालयावर येत आहे कृषी प्रधान म्हणवणा-या या देशात राज्यात कृषी कार्यालयांची अवस्था फारच बिकट व दयणीय झाल्याने शेतकऱ्यांना विविध योजना अधुनिक तंञज्ञाना पासुन वंचित राहावे लागत आहेत . या कार्यालयाचा कारभार व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी रिक्त तीस पदे गरजेचे बनले आहे.
रिक्त पदे भरण्या बाबतीत शासनाकडे सातत्याने पञव्यवहार करुन पाठपुरावा चालु आहे.रिक्त पदांमुळे एका कृषी सहाय्यकाकडे चार ते पाच गावचा अतिरिक्त पदभार द्यावा लागत आहे. कामांचा लोड प्रचंड वाढला असला कार्यालयीन वेळे पेक्षा अधिक काम करुन शेतकऱ्यांची नुकसान होवु नये याची दक्षता घेऊन शेतकरी कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये याची पुरेपुर काळजी घेत आहोत अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी अध्दैत मुळे यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी केवळ 18 कृषी सहायक !
तालुक्यातील 128 महसुली गावातील जवळपास हजारो शेतकऱ्यांसाठी फक्त 18 कृषी सहायक उपलब्ध आहेत. त्यामुळे कृषी सहायकांना शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर येवुन शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकूण 30 पदे रिक्त पदामुळे त्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे.