धाराशिव (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब उस्मानाबादच्या वतीने दिल्या जाणाऱ्या  'राष्ट्र निर्माता पुरस्कार ' 2023-24,चे वितरण रोटरी नेत्र रुग्णालय येथे करण्यात आले. भाई उद्धवराव पाटील प्रशाला, जि.प. प्रशाला सांजा, शम्स उलुम उर्दू प्रशाला, व आर्य चाणक्य विद्यालय या शाळांमधील गायकवाड एस. जी., तनमोर  एस. एम.,माळी पी. एल., शेख ए.ए. या शिक्षकांना जाहीर झाला आहे. 

उत्कृष्ट शिक्षकांची निवड करताना शाळेतील प्रत्येकी दहा विद्यार्थी व मुख्याध्यापक यांना प्रश्नावली देऊन ती भरून घेण्यात आली.त्यातील गुणांकना च्या आधारे उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून ' राष्ट्र निर्माता पुरस्कार ' 2023-24 देण्यात आले, व त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व सत्कारार्थी व डॉ. मनीष देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात आर्य चाणक्य विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मनीष देशपांडे, शम्स उलुम उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक सादत सर, भाई उद्धवराव पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पडवळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास पुरस्कारविजेते, त्यांचे कुटुंबीय व सहकारी, तसेच रोटरी क्लबचे सदस्य, माजी प्रांतपाल रवींद्र साळुंके, हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब धाराशिवच्या अध्यक्ष डॉ. सौ अनार रवींद्र साळुंके या होत्या.  आभारप्रदर्शन व सुत्रसंचलन रोटरी क्लब धाराशिवच्या सचिव डॉ. मीना जिंतूरकर यांनी केले.


 
Top