तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर पंचक्रोषीत घनदाट वनराईत असणाऱ्या अतिप्राचीन श्रीमुदगुलेश्वर शंभु महादेव मंदिरात श्रावणमासा निमीत्ताने शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली होती .आज आयोजित अन्नदान महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.
श्री मुदगुलेश्वर शंभु महादेव मंदिर फुलांनी सजविले होते. मंदिरात जगनाथ मंदिर जगनाथ रथयाञेचा देखावा साकारला होता. बाहेर आकर्षक अशी शेकडो कीलो फुलांचा आकर्षक आरास केला होता. मंदिर परिसरात आयोजित केलेल्या अन्नदान महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला.