धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष या कार्यक्रमांतर्गत ऑपरेशन पोलोच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात “ऑपरेशन पोलो “सायक्लोथॉन” (सायकल रॅली) चे भव्य आयोजन  जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दि. 13 सप्टेंबर  रोजी सकाळी 7.00 वाजता करण्यात आले आहे.

“ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन” जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी चौक - वडगांव (सि) - बावी - बोरी मार्ग - तुळजापूर येथील शिवाजी चौक ते परत तुळजापूर येथून ते  बोरी - बावी - वडगांव (सि) ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील हुतात्मा स्मारक याप्रमाणे मार्ग असणार आहे. या मार्गावर विविध शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थी सायक्लोथॉन रॅलीचे भव्य स्वागत करुन त्यांचा उत्साह वाढविणार आहेत. 

या सायक्लोथॉनमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे या सायक्लोथॉनचे नेतृत्व करणार आहेत. तसेच उस्मानाबाद स्पोर्टस अकॅडमीचे सायकलपटु, पोलीस दलातील जवान, प्रशासनातील अधिकारी, महाविद्यालयातील युवक असे 200 सायकलपटुंनी नोंदणी केली आहे. “ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन” मध्ये सहभागी होणाऱ्या सायकलपटुला प्रशासनाच्या वतीने टी-शर्ट, कॅप, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. “ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन” या रॅलीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक व क्रीडाप्रेमी यांनी सहभागी होण्याचे आवाहान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले  आहे.


 
Top