धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 14 वर्षाखालील राज्य संघ निवडीकरिता आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा 2023-2024 साठी जिल्ह्याचा मुलांचा संघ निवड चाचणी स्पर्धा शनिवार दिनांक 23 /9 /2023 रोजी सकाळी 11:30 वाजता सहारा स्पोर्ट ग्राउंड शिराळा- येरमाळा बार्शी रोड येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव दत्ता बंडगर यांनी दिली.

निवड चाचणी करिता 1/9/2009 ही कट ऑफ डेट असून या तारखेच्या पुढील जन्म असलेल्या खेळाडूंना सहभागी होता येईल. निवड चाचणी करिता जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, खेळाचे संपूर्ण किट, रंगीत फोटो सोबत आणावा. ज्या खेळाडूंची जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे नोंदणी केलेली असेल अशाच खेळाडूंना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होता येईल. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणी साठी सहभाग नोंदवावा असे आवाहन दत्ता बंडगर यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी  रियाज शेख (9284538703), युवराज पवार  (9921897965) यांच्याशी संपर्क साधावा असेही असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.


 
Top