धाराशिव (प्रतिनिधी)-आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने यावर्षीही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतून धाराशिव जिल्ह्यातील महिलांना आपले कलाविष्कार सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
यावर्षी 19 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजेच मंगळवारी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे. गणपती आगमनानंतर दि.21 सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सूुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. याच अनुषंगाने लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने या स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम पारितोषक रु.10,001 असून दुसरे पारितोषिक रु.7001 तर तिसरे पारितोषिक रु.5001 ठेवण्यात आले आहे. दि.22 व 23 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील. संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. तरी जास्तीत जास्त जणांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृपया खालील नंबर वर संपर्क करावा. पुनगुडे मॅडम - 9420200549, अस्मिता कांबळे - 9975227774, उषा येरकळ - 8999385484, संगीता भोरे- 9850262916, सुदेशना जाधवर - 9404623352.