धाराशिव (प्रतिनिधी) - येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इ . ५ व ८ वीच्या तब्बल ३८ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .

प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यानंतर इ . ५ वी व ८ वी च्या या  गुणवंत विद्यार्थ्यांचा व या विदयार्थ्यांना अध्यापन करणारे  शिक्षकगण  अजित माने, संदीप जगताप , ढोले , ओव्हाळ , बोपलकर, लोंढे, क्षीरसागर , चव्हाण , गोरे , डुरे पाटील , बोबडे , गरड यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य व उपमुख्याध्यापक कोळी एस.बी, पर्यवेक्षक गोरे एन. एन, देशमुख डी.ए, शेटे टी.पी. , श्रीमती गुंड बी. बी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी केलेल्या आपल्या भाषणात प्राचार्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना असेच या परीक्षेप्रमाणे यशात सातत्य  ठेवत आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करावे , असा उपदेश  केला. यावेळी या गुणवंत , यशवंत विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले तर सर्वांचे आभार  डी.ए. देशमुख यांनी मानले.

 
Top