धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी ग्रामीण भागातील गावातील ग्रामस्थांशी संवादातून आणि अडचणी समजून घेणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी कळंब तालुक्यातील करंजकल्ला येथे बैठक घेत तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी दुधगावकर यांच्याकडे ग्रामस्थांनी सतत पडणार्या पावसाचे अनुदान, अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँका आडमुठेपणाची भूमिका घेतात. महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. प्रकल्पामधील गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळालेला नाही. पीक कर्जाविषयी काही राष्ट्रीय बँका शेतकर्यांना हेलपाटे मारण्यास लावतात. हुतात्मा स्मारके दुरुस्त करावीत, ग्रामीण भागातील रस्ते यांच्या दूरदशेविषयी लोकांनी आपापले विचार व प्रश्न मांडले, त्यावर दुधगावकर यांनी पीक कर्ज, पावसाचे अनुदान, पिक विमा, दूध दरवाढ, राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती करणे, जिल्ह्यातील हुतात्मा स्मारके दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करणे आदी मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी मा. चेअरमन विनायकराव कवडे, अशोकराव पवार, मा.उपसरपंच अरुण पवार, बापूराव गुजर, नंदकुमार पवार, उमेश कवडे, सुनील पवार, दयानंद कवडे, अभिजीत कवडे, बालाजी कवडे, सचिन पवार, पोपट कवडे, रंजीत पवार, दशरथ पवार, अण्णासाहेब पवार, सचिन दशरथ पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.