धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जय छत्रपती ग्रुप यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 या प्रसंगी जयंतीसाठी अनावश्यक खर्च टाळून शहरातील शालेय विद्यार्थ्यांना आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, पंकज पाटील, बाळासाहेब काकडे, गंगिभाई उर्फ अक्षय कांबळे, हरिभाऊ पेठे, लखन बगाडे, सौरभ अडसूळ, अमित चव्हाण, केशव गायकवाड, अभिनव साखरे, अभिजीत साठे, रणवीर चव्हाण, कोयल पेठे, अजिंक्य जाधव, सुरेश अरुने आदीं उपस्थित होते.


 
Top