परंडा (प्रतिनिधी) - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोणी ता. परंडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
लोणी, ता.परंडा येथील ॲड.अय्युब पठाण यांचे आजोबा सिराजोद्दीन पठाण यांच्या स्मृतीप्रत्यर्थ इ. १० वी च्या गुणवंत विद्यार्थींना ८५.०० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले अशा एकूण २० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०००/- रु पारितोषिक व बक्षिस वितरण मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी,ॲड. अय्युब पठाण, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲड.अनिकेत काशीद, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी लोणी गावातील ग्रामस्थ व जि.प. प्रा. शाळा व श्री संत ज्ञानेश्वर प्रशाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.