धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तीसंग्राम व झालेल्या हुतात्म्यांचे स्मरण व स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याची ओळख पुढल्या पिढीला प्रेरणा स्वरूपात व्हावी म्हणून, तसेच स्वतंत्र भारताचे पहिले अशोकचक्र देखील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका मधील नळदुर्ग च्या घटनेत कॅप्टन बचित्तरसिंग यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे त्यांना मरणोत्तर पहिले अशोकचक्र मिळाले असल्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्राम चे भव्य स्मारकाचे निर्माण आपल्या जिल्ह्यात ही करायचेच आहे असे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत ही सांगितले होते. त्याचा पाठपुरावा ही होता. त्यासंदर्भात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीच्या सदस्यांसोबत सर्किट हाऊस येथे एक बैठकही घेतली होती. 

या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक साठी शासनाने आज 1 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजुरी देऊन तसा शासन निर्णय ही दि. 03 ऑगस्ट 2023 रोजी पारित करण्यात आला आहे. त्याबद्दल मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीच्या वतीने आ. राणा जगजितसिंह पाटील यांचे व शासनाचे ही आभार मानले आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव च्या पार्श्वभूमीवर सदरील स्मारकाचे काम ही लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे संयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज बप्पा नळे यांनी दिली आहे.

 
Top