नळदुर्ग (प्रतिनिधी)- बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक व नळदुर्ग शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अशोकराव पुदाले (वय 85 वर्षे) यांचे दि.30 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनानिमित्त शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अशोकराव पुदाले हे भोई समाजाचे एक जेष्ठ नागरीक होते त्याचबरोबर ते बालाघाट शिक्षण संस्थेचे संचालक व शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते. गेल्या कांही दिवसांपासुन ते आजारी होते. दि.30 ऑगस्ट रोजी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे. दि.30 ऑगस्ट रोजी सायंकाळी नळदुर्ग येथील अलियाबद स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top