तुळजापूर (प्रतिनिधी)- आ. राणाजगजितसिंहजी पाटील  यांनी मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी जुन्या शासकीय विश्रामधाम येथे घेतलेल्या जनता दरबारात जवळपास  175  नागरिकांनी   आपल्या  समस्या मांडल्या असता समस्या संबंधित अधिकरी वर्गास तक्रारदाराचा समोर या समस्या काहीही करुन लवकर दूर करण्याचे आदेश दिले.

महावितरणच्या डीपी जळणे,  आँईल नसणे, विद्युत मोटारी न चालणे, तारा टाकुन नवीन जोडणी देण्या बाबतीत समस्या जनता दरबारात मांडल्या गेल्या. तर महसुलच्या सर्वाधिक  पीकविमा, पगारी न होणे, प्रमाणपञ वेळेवर न मिळणे अदि तक्रारीचा पाढा आमदारांसमोर मांडला. तसेच इतर कार्यालयांच्या समस्या ही यात मांडल्या गेल्या. सकाळी अकरा वाजता या जनता दरबारास आरंभ झाला. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पदाधिकारी मंडळीना बाहेर थांबवुन नागरीकांच्या तक्रारी शांत पणे ऐकुण काही तक्रारीचे जागीच निराकरण केले. तर काही तक्रारीचे संबंधित आधिकारी वर्गास सोडविण्याच्या सुचना दिल्या. तहसिलदार  बोळंगे, गटविकास अधिकारी अमोल वाघमारे, महावितरणचे सुर्यवंशी, नगरपरिषदचे अभियंता अशोक सनगले, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे उपस्थितीत होते.


रेल्वे मार्ग भूसंपादनाचा योग्य मावेजा मिळेल

तालुक्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेसाठी संपादीत होणार आहेत त्यांना कवडीमोल किमंत मिळणार असल्याचे शक्यतेवर अनेक गावचा बाधीत शेतकऱ्यांनी आ. पाटील यांना निवेदन आमच्या जमिनीला योग्य भाव द्या अशी मागणी केली व निवेदने दिले. असता योग्य भाव मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करु असा विश्वास शेतकऱ्यांना आमदार पाटील यांनी दिला. 


प्रत्यक्ष पाहणी नंतर दर्शन मंडप

दर्शन मंडप सोयीचा ठिकाणी करावी यामागणीसाठी महंत मावजीनाथ बुवा, महंत दत्त अरण्य महाराज  यांच्या नेतृत्वाखाली जनता दरबारात आ. पाटील यांना भेटुन निवेदन दिले गेले. असता आ. पाटील यांनी या जागे संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचा सुचना दिल्या व आपण प्रत्यक्ष पाहणी करुन दर्शन मंडप बाबतीत निर्णय घेण्याचे आश्वासन निवेदन कर्त्यांना दिले.


 
Top